क्रिती सेनन – कार्तिक आर्यन अडकणार विवाहबंधनात? दोघांना ‘या’ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर चर्चांना उधाण – kriti sanon and kartik aryan will get married soon

मनोरंजन


बॉलिवूडच्या ‘परमसुंदरी’सोबत कार्तिक आर्यन ही जोडी देखील अडकणार लग्नबंधनात? दोघांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर… का रंगतेय कार्तिक आणि क्रिती यांच्या लग्नाची चर्चा?

मुंबई : अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या चाहत्यांची फार मोठी आहे. दोघांनी सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक भक्कम स्थान निर्माण केलं आहे. ‘प्यार का पंचनामा’ सिनेमातून कार्तिक आर्यन याला लोकप्रियता मिळाली, तर ‘मीमी’ सिनेमातील ‘परमसुंदरी’ गाण्यातील सादरीकरणामुळे क्रिती प्रिसिद्धझोतात आली. आजही दोघांची चर्चा कायम रंगलेली असते. कार्तिक आणि क्रिती यांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे. ‘शहजादा’ सिनेमाच्या माध्यमातून कार्तिक आणि क्रिती एकत्र चाहत्यांच्या भेटीस आले. पण दोघांच्या सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं नाही. ‘मलेरिया’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

सिनेमात कार्तिक आणि क्रिती यांच्या सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं नसलं तरी, दोघांनी मात्र एकमेकांचं प्रेम भेटलं आहे. कारण सध्या कार्तिक आणि क्रिती यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण लग्नाच्या रंगणाऱ्या चर्चांवर कार्तिक आणि क्रिती या दोघांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं नाही. एका महत्त्वाच्या ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट केल्यामुळे कार्तिक आणि क्रिती यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हे सुद्धा वाचा



कार्तिक आणि क्रिती यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी स्पॉट करण्यात आलं. म्हणून कार्तिक आणि क्रिती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी यांच्याप्रमाणे कार्तिक आणि क्रिती देखील गुपचूप लग्न करणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

Kartik Aaryan

मनीष मल्होत्रा याच्या घरी स्पॉट झाल्यामुळे कार्तिक आणि क्रिती चर्चेत आहेत. एवढंच नाही तर कार्तिक आणि क्रिती चांगले मित्र देखील आहेत. शिवाय अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. सध्या सर्वत्र कार्तिक आणि क्रिती यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पण दोघांनी अधिकृत घोषणा केल्यानंतरच त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना कळेल.

सांगायचं झालं तर, याआधी देखील कार्तिक आर्यन याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्याच आलं आहे. अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोहबत असलेल्या नात्याने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

तर क्रिती हिचं नाव देखील अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेता प्रभास याच्यासोबत देखील क्रितीचं नाव जोडण्यात आलं. पण याबद्दल क्रिती अधिकृत घोषणा केली नाही. आता कार्तिकसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *