किस्सा Kiss चा, ‘या’ अभिनेत्रीने साकारला भारतीय सिनेमातील पहिला किसिंग सीन, जाणून घ्या कसं झालं शूटिंग – the first kissing scene in Indian cinema in british rule

मनोरंजन


भारतीय सिनेमात कोणत्या अभिनेत्रीने दिलं पहिलं किसिंग सीन? ‘त्या’ काळात पहिल्या किसिंग सीनची कशी झाली शुटिंग? ‘तो’ सीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर…

मुंबई : आज आपण अनेक सिनेमांमध्ये किसिंग सीन पाहतो. पण एका काळ असा होता जेव्हा अनेक गोष्टींचा विचार करून एखादा बोल्ड सीन सिनेमात साकारला जायचा. भारतीय सिनेमांमध्ये पहिला किसिंग सीन कधी साकारण्यात आला? कोणत्या अभिनेत्रीने भारतीय सिनेमात पहिला किसिंग सीन साकारला? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून किसिंग सीन साकारले जायचे? अभिनेता – अभिनेत्री खरंच एकमेकांना किस करायचे का? बॉलिवूड सिनेमांमध्ये बोल्ड सीन पाहून अनेकांच्या मनात यांसारखे अनेक प्रश्न नक्कीच उपस्थित राहत असतील. आज त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेवू जिने पहिल्यांदा भारतीय सिनेमात किसिंग सीनचं शूट केलं.

भारतीय सिनेमांत एक काळ असा होता, जेव्हा रोमांटिक आणि इंटिमेट सीन साकारण्यासाठी फुलं आणि पक्ष्यांची मदत घेतली जायची.. यामध्ये तसं बघायला गेलं तर यात चुकी कोणाचीही नाही. कारण स्वातंत्र्यापूर्वीचा हा काळ होता, जेव्हा किसिंग किंवा बोल्ड सीन उघडपणे चित्रित करण्याचा विचारही केला जात नव्हता. सामाजिक परिस्थिती, कुटुंबासोबत तेव्हा सिनेमाचा आनंद घेतला जायचा. म्हणून सिनेमांमध्ये किसिंग आणि बोल्ड सीन साकारण्याचा विचारही नाही व्हायचा.

हे सुद्धा वाचा



स्पष्ट सांगायचं झालं तर, तेव्हा भारतील सिनेमे बोल्ड नव्हते. पण तेव्हा एका अभिनेत्रीने सर्व परंपरा मोडत सिनेमात किसिंग सीन दिले होते. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण जवळपास १९२९ साली भारतीय सिनेमात पहिला किसिंग सीन शूट करण्यात आला. फक्त शूट नाही तर, सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित देखील करण्यात आला.

भारतीय सिनेमा जाणणाऱ्या बहुतेकांना वाटतं की, अभिनेत्री देविका राणीने भारतीय सिनेमातील पहिलं पहिलं किसिंग सीन केलं होतं, पण त्यांच्या आधी अभिनेत्री सीतादेवी यांनी १९२९ मध्ये आलेल्या ‘अ थ्रो ऑफ डायस’ या मूकपटात किसिंग सीन दिला होता. या सिनेमात सीतादेवी यांनी अभिनेते चारू रॉय यांना पहिल्यांदाच ऑनस्क्रीन किस केलं होतं.

तेव्हा पहिल्यांदाच ऑनस्क्रीन किसिंग सीन देणं कलाकारांसाठी फार कठीण होतं. ‘अ थ्रो ऑफ डायस’ सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम देखील मिळालं. सिनेमात हजारो कलाकार झळकले होते. यामध्ये १००० घोडे आणि अनेक हत्ती आणि वाघांचा समावेश होता. राजस्थानमधील लोकेशन्सवर सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं.

१९२९ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात महाभारत काळातील दोन राजांची कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन शेजारील भारतीय राज्यांवर राजा रणजीत आणि राजा सोहत या चुलत भावांनी राज्य केलं. सिनेमाने त्या काळात अनेक नवे इतिहास रचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *