बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे काही कलाकार आणि चित्रपट निर्माता असतात. कंगना राणावत थेट नाव घेऊन करण जोहर याला अनेकदा टार्गेट करताना दिसते. करण जोहर देखील कंगना राणावत हिला सडेतोड उत्तर देताना दिसतो.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत असते. विषय कोणताही असो कंगना आपले मत मांडते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून सुरू आहे. अनेकदा कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवू़डचे (Bollywood) काही कलाकार आणि निर्माते असतात. नुकताच कंगना राणावत हिने विमानतळावर मोठे भाष्य केले आहे. यावेळी कंगना राणावत हिने बॉलिवूड माफियांबद्दल भाष्य केले. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिची आई शेतामध्ये काम करताना दिसली.
आता कंगना राणावत हिने केलेल्या बॉलिवूड माफियाच्या वक्तव्यावर करण जोहर याने समाचार घेतलाय. करण जोहर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. मात्र, करण जोहर याने आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाहीये. मात्र, कंगनाला टार्गेट करत ही पोस्ट शेअर करण्यात आलीये. आता करण जोहर याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. करण जोहर याने ही पोस्ट इंस्टा स्टोरीवर शेअर केलीये.
इंस्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत करण जोहर हा म्हणाला की, विमानतळ एक धावपट्टी आहे…विशेष म्हणजे तिथे प्रेस कॉन्फरन्स पण होतात…आता नेक्स्ट टाईम तिथे चित्रपटाचा ट्रेलर देखील लॉन्च होऊ शकतो. (मी या सगळ्याचा एक भाग होईन…काही तक्रार नाहीये) पण काहीवेळा फ्लाइट पकडणेही छान असते.
आता करण जोहर याची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने थेट बाॅलिवूडमध्ये आपल्याला कशाप्रकारे त्रास दिला जात होता हे सांगितले. इतकेच नाहीतर निर्मात्यांनी आपल्याला चित्रपटांमध्ये घेणेही बंद केल्याचे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली.
बाॅलिवूडमध्ये कशाप्रकारचे राजकारण सुरू आहे हे सांगताना प्रियांका चोप्रा दिसली. प्रियांका चोप्रा हिने केलेल्या धक्कादायक खुलाश्यानंतर कंगणा राणावत ही तिच्या सपोर्टसाठी मैदानात उतरली. प्रियांका चोप्रा हिच्या या विधानानंतर कंगना राणावत हिने थेट करण जोहर याच्यावर निशाणा साधला. आता नुकताच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झालीये.
प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट बाॅलिवूडमधील अनेकांनी केला. इतकेच नाहीतर प्रियांका चोप्रा हिची मॅनेजर म्हणाली की, प्रियांका चोप्रा हिची मी मॅनेजर होऊ नये म्हणून अनेकांनी माझ्यावर दबाब आणला होता. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत रणबीर कपूर याच्यावर निशाणा साधला होता.