इंडस्ट्रीत शिव ठाकरेला असेही काही लोक भेटले ज्यांनी भूमिकांच्या बदल्यात पैसे देण्याची ऑफर दिली होती. “अनेकांनी माझ्याकडे पैसे मागितले. तू आम्हाला पैसे दे, आम्ही तुला चांगल्या भूमिका देऊ.. असं अनेकजण म्हणाले”, असंही त्याने सांगितलं.

Shiv Thakare
Image Credit source: Instagram
मुंबई : ‘बिग बॉस 16’मध्ये हजेरी लावल्यानंतर अभिनेता शिव ठाकरेला देशभरात खूप प्रसिद्धी मिळाली. शिवने सुरुवातीपासूनच विविध रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. 2015 पासून शिव इंडस्ट्रीत काम करत आहे. तो रोडीज या प्रसिद्ध शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. मुंबईत आल्यानंतर मला समजलं की फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही भिती वाटू शकते, असं तो म्हणाला. या मुलाखतीत शिवने कास्टिंग काऊचचे दोन अनुभव सांगितले.