शाकुंतलम या चित्रपटात समंथा शकुंतलाची भूमिका साकारतेय. शकुंतला ही मेनका आणि विश्वमित्रा यांची कन्या असते. या चित्रपटात मोहन बाबू, प्रकाश राज, अदिती बालन, गौतमी, अनन्या नागल्ला, कबीर दुहन सिंह यांच्याही भूमिका आहेत.

Samantha
Image Credit source: Instagram
हैदराबाद : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये समंथा तिच्या आजारपणाविषयी आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने मायोसिटीसवरील उपचार आणि त्यानंतर शरीरावर झालेल्या परिणामांबद्दल सांगितलं. मायोसिटीस या ऑटो इम्युन आजारामुळे समंथाने गेल्या वर्षी काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला या आजाराचं निदान झालं आणि त्यानंतर तिने उपचारासाठी ब्रेक घेतला. उपचारानंतर समंथा आता पुन्हा कामावर परतली आहे.