पीएस- 1 या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. तमिळनाडूमध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा रेकॉर्ड पीएस-1 ने मोडला होता.

Ponniyin Selvan 2
Image Credit source: Youtube
चेन्नई : दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा ट्रेलर बुधवारी चेन्नईमधील नेहरू स्टेडियममध्ये लाँच करण्यात आला. यावेळी अभिनेते कमल हासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्या भागाप्रमाणेच या सीक्वेलच्या ट्रेलरमध्येही भव्यदिव्य सेट आणि थक्क करणारे सीन्स पहायला मिळतात. या मल्टिस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा नंदिनीची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.