Farm | शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीतून मिळणारं भरघोस उत्पन्न; सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या पात्रता

कृषी


Farm | शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. परंतु, पाण्याचा मोठा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणं अवघड होत. म्हणूनच शेतीसाठी शेतकऱ्यांना पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी शेततळे (Farm) फायद्याचे पडते. तर शेतकऱ्यांना या शेततळ्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. चला तर मग शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी (Farm) किती अनुदान दिले जाते, काय अटी आहेत हे जाणून घेऊयात.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

मागेल त्याला शेततळे
राज्यात शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ (Magel Tyala Shettale)योजना राबवली जाते. ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेततळे (Farm) तयार करू शकतात. यामधून शेतकऱ्यांना नक्कीच शेतीसाठी मोठा फायदा होईल. राज्यातील जवळपास 80 टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे सिंचचनाभवी शेती उत्पादनात घट होत आहे. यामुळेच राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजना (Farm Subsidy) राबवण्यात येत आहे.

काय आहे पात्रता?

  • शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर शेतजमीन असावी.
  • क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही.
  • महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे एकत्रित सोडतीत निवडीचा निर्णय घेण्यात येतो.
  • उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यात येतो.
  • शेततळ्यासाठी कमी पाझराची जमीन निवडावी.
  • टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य, तीन टक्क्यांपेक्षा कमी जमिनीच्या उतार पद्धतीची असणे आवश्यक.
  • शेततळ्यासाठी मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र, दलदलीची, चिबड जमीन निवडू नये.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

किती मिळते अनुदान?
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 14 हजार 433 रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. हे अनुदान शेततळ्याच्या आकारमानानुसारही देण्यात येते. जर शेततळ्याचा आकार 15× 15 × तीनपासून 34 × 34 × तीन मीटरपर्यंत असू शकतो. जर शेतकऱ्यांना जास्त आकारमानाचे शेततळे घेण्यात घ्यायचे असेल तर त्यासाठी लागणारा उर्वरित खर्च सदर शेतकऱ्याला करावा लागतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Abundant income from farmers’ fallow land; Take advantage of the government’s ‘Magel Aye Shetale’ scheme, know the eligibility

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *