या चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, आमला पॉल, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते.

Bholaa
मुंबई : गेल्या काही वर्षांत बॉलिवूड चित्रपटांना पायरसीचा मोठा फटका बसला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच ऑनलाइन लीक झाल्याने कलाविश्वातून संताप व्यक्त होतोय. पायरसीविरोधात कठोर नियम असूनही त्यावर अद्याप वचक बसला नाही. याचाच फटका आता अजय देवगणच्या चित्रपटालाही बसला आहे. रामनवमीनिमित्त अजयचा ‘भोला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला.