2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. कैथी या तमिळ चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वांत आधी त्याच्या मुलीला भेटायचं ठरवतो.

Bholaa
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. आता पहिल्या दिवशी ‘भोला’ची कमाई किती होणार, याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, संजय मिश्रा, आमला पॉल आणि दीपक डोब्रियाल यांच्या भूमिका आहेत. भोला या चित्रपटाचा बजेट जास्त असला तरी त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही. मात्र या चित्रपटातील कलाकारांना किती फी मिळाली, याची माहिती समोर आली आहे.