19 मार्चपासून ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खुद्द अजयने तब्बूसोबत व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली.

Ajay Devgn and Tabu
Image Credit source: Youtube
मुंबई : अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. गुरुवारी प्रदर्शित झाल्याने वीकेंडपर्यंत या चित्रपटाची कमाई दमदार होईल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करत नव्हते. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉलिवूडला नवसंजीवनी दिली. तर अजयच्या ‘दृश्यम 2’नेही चांगली कमाई केली होती. आता त्याचा ‘भोला’ पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवू शकेल, याचा अंदाज वर्तवला जात आहे. भोलाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा सकारात्मक झाली आहे.