Alia Bhatt | आलिया भट्ट हिने केला अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझ्या लग्नाच्या मेहंदीमध्ये – Bollywood actress Alia Bhatt made a big revelation

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया भट्ट ही सोशल मीडिया सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच आलिया भट्ट ही शेअर करताना दिसते. नुकताच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आलिया भट्ट हिने चाहत्यांना एक अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे.

Alia Bhatt | आलिया भट्ट हिने केला अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझ्या लग्नाच्या मेहंदीमध्ये

Image Credit source: Instagram

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही कायमच चर्चेत असते. आलिया हिने तिचा 30 वा वाढदिवस हा लंडनमध्ये साजरा केला. यावेळी रणबीर कपूर, तिची आई आणि बहीण शाहीन या उपस्थित होत्या. आलिया भट्ट हिने वाढदिवसाचे काही खास फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केले. या फोटोमध्ये आलिया भट्ट हिचा लूक जबरदस्त असा दिसत होता. आलिया भट्ट ही सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी कायमच आलिया फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिलला लग्नगाठ बांधली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अचानकच लग्न करत असल्याचे जाहिर करत 14 एप्रिल लग्न केले. यानंतर यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे बरेच दिवस आलिया भट्ट हिच्या लग्नाची चर्चा देखील रंगली. लग्नाच्या ड्रेसमध्ये आलिया भट्ट ही जबरदस्त आणि सुंदर दिसत होती.

लग्नानंतर काही दिवसांमध्येच आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राहा हिच्या नावाचा अर्थ सांगत एक खास फोटोही शेअर केला. मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांमध्ये आलिया भट्ट ही व्यायाम करताना देखील दिसली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मुलगी राहा हिची एक झलकही दाखवली नाहीये. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते आलियाच्या मुलगीची झलक पाहण्यास आतुर आहेत. आलिया भट्ट हिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना एक अत्यंत मोठे गिफ्ट दिले. आलिया भट्ट हिने वाढदिवसाच्या दिवशी खास व्हिडीओ तयार करून शेअर केला. या व्हिडीओमध्ये आलिया वेगवेगळ्या लोकेशनवर दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट हिने मोठा खुलासा केला. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट म्हणाली की, मला मेहंदी काढायला कायम आवडते. पण माझ्या लग्नाच्या मेहंदी वेळी मी खूप जास्त बोर झाले होते. आलिया भट्ट हिचे हे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ही रणबीर कपूर याच्याबद्दल बोलताना देखील दिसत आहे. आलिया भट्ट ही लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *