पोलीस सध्या समर सिंह आणि संजय सिंहच्या शोधात आहेत. यासाठी त्यांनी टीम बनवल्या असून वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे आकांक्षासोबत तिच्या हॉटेल रुममध्ये गेलेली व्यक्ती कोण होती, याचं ठोस उत्तर अद्याप पोलिसांनी दिलं नाही.

Image Credit source: Instagram
उत्तर प्रदेश : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने 26 मार्च रोजी वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्याठिकाणी ती शूटिंगसाठी गेली होती. अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं. आकांक्षाच्या रुममधून कोणतीच सुसाइड नोट मिळाली नव्हती. उत्तर प्रदेशचे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. आकांक्षाने ज्या रात्री आत्महत्या केली, त्यावेळी तिच्यासोबत एक व्यक्ती तिच्या हॉटेल रुममध्ये आली होती. ती व्यक्ती आकांक्षाच्या हॉटेल रुममध्ये 17 मिनिटं होती. पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे आकांक्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा पोलिसांच्या हाती आला आहे. आकांक्षाचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त संतोष सिंह यांनी दिली. तिच्या शरीरावर कोणत्याच खुणा आढळल्या नाहीत.