आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती.

Adipurush
Image Credit source: Instagram
मुंबई : रामनवमीनिमित्त ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सनॉन आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग दिसून येतोय. राम-सीता आणि लक्ष्मण यांच्यासमोर नतमस्तक झालेले हनुमानही या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहेत. अभिनेता देवदत्ता नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे. ‘आदिपुरुष’च्या टीझर आणि ट्रेलरवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दिग्दर्शकांनी बदल करण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. मात्र आता या नव्या पोस्टरवरही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.