गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही प्रचंड चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सातत्याने व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाहीतर या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलीये. परिणीती चोप्रा हिचे नाव आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) याच्यासोबत जोडले जात आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे दोघे मुंबईमध्ये अनेकदा स्पाॅट झाले आहेत. इतकेच नाहीतर लवकरच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सातत्याने रंगत आहे. परिणीती चोप्रा ही लग्नाचे शाॅपिंग (Wedding shopping) देखील करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, यावर राघव चड्ढा किंवा परिणीती चोप्रा यांनी काहीही भाष्य केले नाहीये.
काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये राघव चड्ढा याला परिणीती चोप्रा हिच्यासोबत लग्न कधी करणार हे विचारण्यात आले. यावेळी लाजताना राघव चड्ढा हा दिसला. इतकेच नाहीतर विमानतळावर परिणीती चोप्रा हिला देखील राघव चड्ढा याच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, राघव चड्ढा याच्याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे न देता परिणीती निघून गेली.
आता नुकताच एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा याच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच दिल्ली विमानतळावर परिणीती चोप्रा हिला घेण्यासाठी खासदार राघव चड्ढा हा पोहचला होता. यावेळी परिणीती चोप्रा ही फास्टमध्ये राघव चड्ढा याच्या गाडीमध्ये बसताना स्पाॅट झाली.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक फोटो शेअर करत आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना शुभेच्छा देत आर्शिवाद दिले. यानंतर चर्चांना उधाण आले आणि परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जातंय.
विशेष म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा लवकरच पार पडणार असल्याची चर्चा असून तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली येथे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा पार पडणार असे सांगितले जातंय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात परिणीती आणि राघव यांचा रोका म्हणजे लग्नापूर्वी असलेली एक विधी पार पाडणार आसल्याची देखील चर्चा रंगत आहे.