लंडन : चांगले पगार आणि सुरक्षित वातावरणाची मागणी करत ब्रिटनमध्ये पाच लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शिक्षक, नागरी सेवक, कनिष्ठ डॉक्टर, परिचारिका, ट्रेन आणि ट्यूब चालक, रेल्वे आणि टपाल कर्मचारी यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर गेल्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनकही तणावात आहेत.
इंग्लंड आणि वेल्समधील नॅशनल एज्युकेशन युनियनचे शिक्षक संपावर गेल्यामुळे 23,400 शाळांवर परिणाम झाला, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली. शिक्षक संघटनेने म्हटले आहे की शालेय व्यवस्थेतील भरती आणि दशकभरापासून कमी पगार हे या निर्णयाचे प्रमुख कारण आहेत. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये
डिसेंबरपासून हे कर्मचारी संप करत आहेत.
प्रत्युत्तरात, पंतप्रधान ऋषी सुनक यांचे प्रवक्ते म्हणाले की अशा संपामुळे लोकांचे जीवन विस्कळीत होईल, संवाद हा योग्य दृष्टीकोन आहे. या संपामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावर मोठया प्रमाणावर परिणाम होत आहे.