गुनीत मोंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, ऑस्कर पुरस्कारातील वादावर चर्चा? सोशल मीडियावर पोस्ट – Oscar Award winner Guneet Monga met Prime Minister Narendra Modi

मनोरंजन


ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून चित्रपटांचे आणि त्यांच्या टिमचे काैतुक केले जाते होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचे अभिनंदन केले होते. बाॅलिवूडच्या अनेक कलाकरांनी देखील सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या टिमचे काैतुक केले होते.

मुंबई : गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ चित्रपटाने 95 व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये (Oscar Award) सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीत इतिहास रचून थेट ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले आहे. गुनीत मोंगा यांच्या चित्रपटाने पुरस्कार जिंकल्यानंतर सर्वत्र त्यांचे काैतुक करण्यात आले. फक्त गुनीत मोंगा (Guneet Monga) यांचाच चित्रपट नाहीतर साऊथचा सुपरहिट ठरलेला आरआरआर चित्रपटाने देखील मोठा इतिहास हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रचला आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकला. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये भारताचा बोलबाला दिसून आला.

ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून चित्रपटांचे आणि त्यांच्या टिमचे काैतुक केले जात होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचे अभिनंदन केले होते. विशेष म्हणजे बाॅलिवूडच्या अनेक स्टारने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते.

नुकताच गुनीत मोंगा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटण्यासाठी पोहचल्या होत्या. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दोन फोटो शेअर केले आहेत. आता नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केलीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, द एलिफंट व्हिस्परर्सच्या यशाने जागतिक लक्ष वेधून घेतले आणि प्रशंसा मिळवली. आज त्याच्याशी निगडीत अद्भुत टीमला भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताचा गौरव केला आहे. या फोटोमध्ये गुनीत मोंगा या दिसत आहेत. आता ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर आरआरआर चित्रपटाचे संगीतकार एमएम किरावानी यांनी एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. एमएम किरावानी यांनी मुलाखतीमध्ये ऑस्कर 2023 मध्ये गुनीत मोंगा यांच्या भाषणाच्या कट ऑफ वादावर मोठा खुलासा केला होता. ऑस्कर पुरस्कार काय घडले हे त्यांनी सांगितले.

एमएम किरावानी म्हणाले होते की, ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांचा अचानकच श्वास कोंडायला लागला आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे रूग्णालयाच दाखल करण्यात आले होते, एमएम किरावानी यांचे हे बोलणे ऐकून यांना धक्का बसला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *