अजय देवगण याला पैशांची तंगी? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्याने केला मोठा खुलासा – Ajay Devgn made a big revelation while answering a fan’s question

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या भोला या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट आजच रिलीज झालाय. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करण्याची शक्यता आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजच अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार असे प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसला होता. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट (Movie) नेमके कोणते रेकाॅर्ड तोडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजय देवगण याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाकेदार कामगिरी करताना बाॅक्स आॅफिसवर दिसत आहेत. ज्यावेळी बाॅलिवूडचे (Bollywood) जवळपास सर्वच चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी अजय देवगण याचा चित्रपट धमाका करताना दिसला.

आजचा दिवस हा अजय देवगण याच्यासाठी अत्यंत मोठा आणि खास नक्कीच आहे. कारण आजच्याच दिवशी अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय आणि दुसरीकडे त्याचा आगामी मैदान या चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. याचवर्षी अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपासून अजय देवगण हा चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सेशनचे आयोजन करताना दिसत आहे. या सेशनमध्ये अजय देवगण हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत आहे. शाहरूख खान याने देखील पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चाहत्यांसाठी अशाप्रकारच्या सेशनचे आयोजन केले होते.

अजय देवगण याने आयोजित केलेल्या या सेशनमध्ये चाहते मोठ्या प्रमाणात त्याला प्रश्न विचारताना दिसले. एक चाहता अजय देवगण याला म्हणाला की, सर महिना अखेर आहे, त्यामुळे थोडी तंगी आहे…चित्रपटाचे तिकिट स्पॉन्सर करा…चाहत्याच्या या प्रश्नाला हटके स्टाईलमध्ये उत्तर देताना अजय देवगण हा म्हणाला की, माझे पण तेच सुरू आहे. म्हणजे महिना अखेर असल्याने आपल्याकडे देखील पैसे नसल्याचे म्हणताना अजय देवगण दिसला. अजय देवगण याच्या या उत्तरानंतर अनेकांनी अंदाज बांधला आहे की, अजय देवगण याच्याकडे देखील पैशांची तंगी आहे.

काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका करत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. दृश्यम 2 चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. भोला चित्रपट देखील धमाका करेल असे सांगितले जातंय. आता भोला चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. भोला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अजय देवगण हा कपिल शर्मा याच्याही शोमध्ये पोहचला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *