UPI Payment | लोकांचा UPI द्वारे पेमेंट करण्यावर विशेष भर असतो. बऱ्याचदा UPI द्वारे मोठे पेमेंट केल्यावर कॅशबॅक सुद्धा मिळतो. मात्र आता नव्या आर्थिक वर्षापासून UPI द्वारे पेमेंट करणे महागात पडू शकते. ठराविक रकमेच्या वर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला आता एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे.
UPI द्वारे पेमेंट करणे पडणार महागात
त्याच झालंय असं की, येत्या 1 एप्रिल पासून नॅशनल नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI च्या माध्यमाने म्हणजेच ऑनलाइन केल्या जाणाऱ्या मर्चंट ट्रांझॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्स (PPI) फी लागू करण्यास सांगितली आहे. यामुळे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या सर्वांनाच चांगला फटका बसणार आहे.
2000 रुपयांपेक्षा जास्त ट्रांझॅक्शनवर लागणार चार्ज
नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार, नवीन आर्थिक वर्षापासून 2000 रुपयांपेक्षा जास्त ट्रांझॅक्शनवर आता चार्ज लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा चार्ज मर्चंट ट्रांझॅक्शंस म्हणजेच व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या सर्व युजर्सना द्यावा लागणार आहे. सामान्य युजर्सना हा चार्ज द्यावा लागणार नाही.
1.1 टक्का इंटरचेन्ज फीस द्यावी लागणार
प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्सच्या माध्यमाने आता UPI पेमेंटवर 1.1 टक्का इंटरचेन्ज फीस ( Interchange Fees) लागेल. महत्वाची बाब म्हणजे, PPI मध्ये व्हॉलेट किंवा कार्डच्या माध्यमाने ट्रांझॅक्शन येते. मात्र इंटरचेन्ज फीससंदर्भात बोलायचे झाल्यास, ही सर्वसाधारणपणे कार्डच्या माध्यमाने केल्या जाणाऱ्या ट्रांझॅक्शनशी संबंधित आहे.
इंटरचेन्ज फी ही देवाण घेवाण स्वीकार करणे, प्रोसेसिंग अथवा मंजूरीसाठी लागणारा खर्च कव्हर करणे यासाठी आकारली जाते. इंटरचेन्ज फी 1 एप्रिल पासून सुरू होणार असून 30 सप्टेंबर पर्यंत याची समीक्षा केली जाणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
NCPI’s New circular Interchange fees on UPI payment