Salman Khan धमकी प्रकरणात मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी थेट ब्रिटन सरकारला पाठवलं पत्र – Salman Khan Threat Mail mumbai police send a letter to the british government

मनोरंजन


अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं ब्रिटन कनेक्शन… मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर समोर येणार सत्य… धमकी प्रकरणी सर्वत्र खळबळ

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला १८ मार्च रोजी जीवे मारण्याची धमकी दिली. एका ई-मेलच्या माध्यमातून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भाईजानला धमकी मिळाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एक मोठी अपडेट दिली आहे. सलमान खान याला ज्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे, ती व्यक्ती गोल्डी ब्रार असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इंटरपोलचं सहकार्य घेतलं आहे. सध्या पोलीस सलमान खान धमकी प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; मुंबई पोलिसांनी कायदेशीर मार्गांद्वारे ब्रिटन सरकारला विनंती पत्र पाठवलं होतं. पत्रात पोलिसांनी संबंधीत माहिती जोडली आहे. ज्यामध्ये UK मधील ठिकाणाचा उल्लेख आहे ज्या ठिराणाहून सलमान खानला जीवे मारण्याचा ई-मेल पाठवला गेला आहे.

यासोबतच मुंबई पोलिसांनी यूके सरकारला आयपी अॅड्रेसही पाठवला आहे. गोल्डी ब्रारने हा ई-मेल पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, ब्रिटन सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर, नक्की प्रकरण काय आहे..समोर येईल.. त्यानंतर मुंबई पोलीस गोल्डीला भारतात आणण्याचा प्रयत्न करतील. असं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचाअभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्याला धमकीचा मेल आल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना देखील सतर्क राहण्यास सांगितलं होतं. शिवाय अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. सलमानला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहू नकोस अशी सूचना देण्यात आली आहे.

धमकीच्या ईमेल अगोदर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने जेलमधून एका मुलाखती वेळी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांनी वाढ केली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला Y + दर्जाची सुरक्षा दिली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलवारला धमकीचा एक ई-मेल मिळाला होता. या ई-मेलमध्ये सलमानशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. हा ई-मेल रोहित गर्ग नावाच्या एका व्यक्तीने पाठवला होता. याप्रकरणी रोहित गर्ग, लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या विरोधात एफआरआय दाखल केली आहे. लॉरेंस बिश्नोई याने याआधी देखील एका व्हिडीओमध्ये सलमान खान याला धमकी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *