ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्म न केल्यानेही चाहत्यांमध्ये वादाबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता. या दोघांना ऑस्करच्या मंचावर परफॉर्म करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र दोघांनी नकार दिला.

Ram Charan and Jr NTR
Image Credit source: Instagram
हैदराबाद : एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर यातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर असे दोन अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारही पटकावले. ‘आरआरआर’मधील रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. चित्रपटात ऑनस्क्रीन या दोघांची मैत्री दाखवण्यात आली. तर ऑफस्क्रीनही दोघे एकमेकांचे खास मित्र आहेत. मात्र त्यांच्या मैत्रीत फूट पडल्याची माहिती समोर येत आहे.