प्रियांका आणि निक यांची भेट 2018 मध्ये झाली आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न केलं. त्यावेळी प्रियांका 36 आणि निक 26 वर्षांचा होता. निकला भेटण्याच्या खूप आधीच मी एग्स फ्रीज केले होते, असं प्रियांकाने सांगितलं.

Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळवली आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये प्रियाकांने बॉलिवूड सोडून हॉलिवूडला जाण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं. यासोबतच प्रियांका तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या पॉडकास्टमध्ये तिने सांगितलं की, आईच्या सांगण्यानुसार प्रियांकाने वयाच्या तिशीतच आपले एग्स फ्रीज केले होते. एग्स फ्रीज करण्याच्या निर्णयाबद्दल तिने खुलेपणाने भाष्य केलं. त्याचप्रमाणे तरुणींना मोलाचा सल्लादेखील दिला. प्रियांका ही एग्स फ्रीज करणारी पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री नाही. याआधीही बऱ्याच अभिनेत्रींनी हा मार्ग स्वीकारला आहे.