Priyanka Chopra च्या घरी होता शाहीद कपूर, सकाळ होताच दोघांवर मोठं संकट! ‘त्या’ एका घटनेनंतर… – Shahid Kapoor and Priyanka Chopra love story and Break Up

मनोरंजन


सकाळी कोणी ठोठावला अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा दरवाजा? समोर शाहीद कपूरला पाहिल्यानंतर सर्वत्र खळबळ… आजही दोघांची लव्हस्टोरी चाहत्यांमध्ये चर्चेत

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आज अभिनेत्री पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी हिच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा प्रियांका आणि अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) यांच्या नात्याची चर्चांनी जोर धरला होता. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. प्रियांका आणि शाहीद यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. मोठ्या पडद्यावर दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमांशिवाय अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघांचं नातं एक वेगळं वळणं घेईल त्याआधीच एक मोठा प्रसंग घडला आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

शाहीद कपूर याचं नाव फक्त अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत नाही तर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघींसोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. काही वर्षांनंतर करीनाने अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं, तर प्रियांकाने निक जोनस याच्यासोबत. शाहीद देखील मीरा राजपूत हिच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. (Shahid Kapoor and Priyanka Chopra love story)

पण एक काळ असा होता जेव्हा प्रियांका आणि शाहीद यांच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या. प्रियांका आणि शाहीद ‘कमीने’ सिनेमासाठी एकत्र शुटींग करत होते. तेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला. दोघांचं नातं एका धक्कादायक घटनेनंतर समोर आलं. जेव्हा पहाटे प्राप्तिकर विभागाने प्रियांकाच्या घरावर छापा टाकला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा शाहिद प्रियांकाच्याच घरी होता. अधिकाऱ्यांनी दरवाजा ठोठावल्यावर शाहीदनेच दार उघडला.

हे सुद्धा वाचा



या घटनेनंतर सर्वत्र प्रियांका आणि शाहीद यांच्या नात्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. पण प्रियांका आणि शाहीद यांचं नातं टिकू शकलं नाही. काही काळानंतर प्रियांका शाहीदपासून दूर राहू लागली… अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांची जोडी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

प्रियांका आणि शाहीद आज त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर प्रियांका आणि शाहीद चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघेही त्यांच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *