यामध्ये ऐश्वर्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. सूड घेण्यासाठी सज्ज असणारी राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवी अशा दोन भूमिका तिने साकारल्या आहेत. पहिल्या भागातील तिच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली होती.

Aishwarya and Abhishek
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. ऐश्वर्याने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. आता याच चित्रपटाचा सीक्वेल ‘पोन्नियिन सेल्वन 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ऐश्वर्याने सोशल मीडियावर या सीक्वेलचा पोस्टर आणि टीझर शेअर केला आहे. यामधील नंदिनीच्या भूमिकेतील ऐश्वर्याच्या लूकवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय. चाहत्यांसोबतच पती अभिषेक बच्चनलाही या लूकवर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही. अभिषेकनेही ऐश्वर्याच्या या पोस्टरवर कमेंट केली आहे.