Incentive Grant | बिग ब्रेकिंग! नियमित कर्जदारांना 50 हजारांचे अनुदान वितरीत, जाणून घ्या सविस्तर

कृषी


Insentive Grant | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 50 हजारांचे अनुदान (Insentive Grant) देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची पाचवी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी कोट्यावधींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे. यामुळे आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान (Incentive Grant) जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

शेतकऱ्यांना अनुदान वितरीत
आतापर्यंत प्रोत्साहन अनुदानाच्या चार याद्या प्रकाशित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजारांच्या अनुदानाचे (Incentive Grant) वाटप करण्यात आले आहे. आता उर्वरित पात्र शेतकरी या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. शेतकऱ्यांसाठी पाचवी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आधार ई केवायसी करणे बंधनकारक आहे. आधार ई केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळत आहे. तहान अनुदानासाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्बल 1 हजार 14 कोटी रुपयांच्या निधीचे तरतूद करण्यात आली होती. अखेर हे अनुदान शस्त्रांच्या खात्यात जमा करण्यात मान्यता देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! 50 thousand subsidy distributed to regular borrowers, know in detail


आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *