Crop Damage | ब्रेकिंग! अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एनडीएफआरच्या नव्या निकषानुसार मदत, जाणून घ्या…

कृषी


Crop Damage | राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली शेती पिके (Crop Damage) अवकाळी पावसामुळे झोपल्याने आणि गारपिटीमुळे अक्षरशः भुईसपाट झाली पाठ झाली आहे. याच अवकाळी पावसामुळे (Crop Damage) नुकसान झालेले शेतकरी हवालदार झाले आहेत. याच शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. चला तर मग सविस्तरपणे याबाबत माहिती जाणून घेऊयात.

किती क्षेत्रावर झाले नुकसान?
राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 1370 हेक्टर रब्बी हंगामातील शेती पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. तर अशातच यंदाही शेती पिकांचे (Crop Damage) नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार नव्या निकषानुसार मदत
याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांहून अधिक शेती पिकांचे (Crop Damage) नुकसान झाले आहे असे शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरतात. तर यानुसार राज्यातील 2 हजार 663 शेतकऱ्यांना 1 हजार 369 क्षेत्रासाठी एनडीआरएफ नव्या निकषानुसार मदत दिली जाणार आहे.

किती मिळणार मदत?
नवीन एनडीआरएफच्या निकषानुसार रब्बीच्या जिरायती पिकांसाठी 8 हजार 700 रुपये हेक्टर, बागायती पिकांना 17 हजार रुपये हेक्टर व फळपिकांना 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Farmers affected by untimely rains will get help according to new norms of NDFR, know…


आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *