या चित्रपटात यामी गौतम आणि सनी कौशलशिवाय शरद केळकरचीही भूमिका आहेत. सनी कौशल आणि यामी गौतमचं अभिनय प्रत्येक सीनमध्ये दमदार आहे. अजय सिंह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नेटफ्लिक्सवर तो प्रदर्शित झाला आहे.

चोर निकाल के भागा
Image Credit source: Instagram
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपटांची भर पडत असते. नुकताच यामी गौतम आणि सनी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘चोर निकल के भागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजय सिंह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नेटफ्लिक्सवर तो प्रदर्शित झाला आहे. हल्लीच्या चित्रपटांमध्ये कथेला अधिक महत्त्व आहे. संतुलित स्क्रिप्ट लिहिणं हे लेखकांसमोरही नवीन आव्हान आहे. प्रेक्षकांना कथेतील रंजक वळणं फार आवडतात आणि हेच ट्विस्ट – टर्न्स ‘चोर निकल के भागा’ चित्रपटात पहायला मिळतात.