Amrita Singh ला ‘या’ अभिनेत्यापासून दूर ठेवण्यासाठी आईचा राजकीय दबाव – Amrita Singh and Vinod Khanna uncomplete love story due mother and political pressure

मनोरंजन


सैफ अली खान याच्याआधी अमृता सिंग हिचं ‘या’ अभिनेत्यावर जडला होता जीव…पण अभिनेत्रीच्या आईला मान्य नव्हतं दोघांचं नातं, लेकीला बॉयफ्रेंडपासून दूर करण्यासाठी आईचा राजकीय दबाव

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेमप्रकरणं आहेत, जे कुटुंबियांच्या दबावामुळे आणि आईच्या हट्टामुळे लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आईला मुलीने निवडलेला मुलगा आवडला नाही, तर कधी मुलाने निवडलेल्या मुलीला आईचा विरोध होता. असा प्रसंग अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) हिच्यावर देखली आहे. अखेर आईच्या हट्टापुढे अभिनेत्रीला प्रेमाचा त्याग करावा लागला. अमृता सिंगच्या आयुष्यात सैफ अली खान याची एन्ट्री होण्याआधी अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) याच्यासोबत अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अमृता सिंग हिच्या सौंदर्याची आणि अभिनयची चर्चा होती. बॉलिवूडमध्ये नवीन असताना अमृता सिंग हिचं नाव विनोद खन्ना याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. एवढंच नाही तर, दोघांनी लग्न केलं अशा चर्चांनी देखील जोर धरला.

१९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बटवारा’ सिनेमातून दोघांच्या नात्याची सुरुवात झाली. तेव्हा अभिनेत्री क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना डेट करत होती. पण विनोद खन्ना यांची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांचं नातं फार पुढे गेलं.

हे सुद्धा वाचापण विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांचं नातं अभिनेत्रीच्या आईला मान्य नव्हतं. अमृता सिंग हिची आई रुख्शाना यांना जावयाच्या रुपात विनोद खन्ना नको होते. म्हणून दोघांनी विभक्त करण्यासाठी रुख्शाना यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक मोठ्या सेलिब्रिटींची मदत घेतली. पण अमृता, विनोद खन्नाची साथ सोडण्यासाठी तयार नव्हत्या.

अनेक प्रयत्न करून देखील रुख्शाना यांना विनोद खन्ना आणि अमृता सिंग वेगळं करण्यात अपयश मिळालं. अशात अभिनेता सैफ अली खान याला देखील अमृता आवडत असल्याची माहिती रुख्शाना यांना मिळाली. रिपोर्टनुसार, विनोद खन्ना आणि अमृता सिंग वेगळं करण्यासाठी रुख्शाना यांनी राजकीय मदत घेतली.

राजकीय दबाव आल्यामुळे विनोद खन्ना यांनी अमृतापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विनोद खन्ना याच्यापासून लेकीला विभक्त करण्यात रुख्शाना यांना यश मिळालं. त्यानंतर अमृता हिने १९९१ साली सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नानंतर  चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या १३ वर्षांनंतर अमृता आणि सैफ विभक्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *