जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

Samar Singh and Akanksha Dubey
Image Credit source: Instagram
वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर तिची आई मधू दुबे सोमवारी वाराणसीला पोहोचली. यावेळी मधू दुबे यांनी भोजपुरी गायक समर सिंह आणि संजय सिंह यांच्यावर हत्येचा आरोप केला. आकांक्षाने व्हॅलेंटाइन डेनिमित्त इन्स्टाग्रामवर समरसोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. समर आणि संजयने मिळून माझ्या मुलीची हत्या केली, असा आरोप आकांक्षाच्या आईने केला आहे.