धर्म बदलला, गर्लफ्रेंडसोबत गुपचूप लग्नानंतर…., प्रसिद्ध अभिनेत्याने खासगी आयुष्यावर सोडलं मौन – Vivian Dsena breaks silence on his private wedding and 4 years old daughter

मनोरंजनअनेक वर्षांनंतर अखेर प्रसिद्ध अभिनेत्याने खासगी आयुष्यात घडलेल्या गोष्टी चाहत्यांना सांगितल्या; अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर चाहते हैराण

मुंबई : झगमगत्या विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे, त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण? अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण काही सेलिब्रिटी त्यांचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवतात. कुटुंबाला झगमगत्या विश्वासमोर न आणण्याचा त्यांचा निर्णय असतो. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता विवियन डीसेना (Vivian Dsena)… विवियन डीसेना याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता अभिनेता विवियन डीसेना याने अनेक वर्षांनंतर त्याच्या खासगी आयुष्याचा खुलासा केला आहे. विवियन डीसेना कायम त्याचं आयुष्य गुपित ठेवतो. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गर्लफ्रेंड नौरान हिच्यासोबत गुपचूप लग्न आणि मुलीच्या जन्मामुळे चर्चेत आहे.

विवियन डीसेना याने अखेर रंगणाऱ्या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने अनेक वर्षांनंतर सर्व काही सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘माझं लग्न झालं आहे आणि मला ४ वर्षांची मुलही आहे. यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही.. तरी देखील या गोष्टीसाठी अनेक जण चिंतेत आहेत..’

हे सुद्धा वाचापुढे अभिनेता म्हणाला, ‘मला वाटलं ही योग्य वेळ आहे, तेव्हा मी लग्न आणि माझ्या मुलीच्या जन्माबद्दल सांगितलं. मी नौरान हिच्यासोबत इजिप्तमध्ये गुपचूप लग्न केलं आणि वडील होणं आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे… आम्ही आमच्या मुलीचं नावा लायान विवियन डीसेना असं ठेवलं आहे…’

खासगी आयुष्याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मी माझं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवतो. प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात अंतर ठेवायला मला आवडतं. मला माझ्या कुटुंबाला झगमगत्या विश्वासमोर आणायचं नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

मुलाखतीत अभिनेत्याने धर्माबद्दल देखील मोठा खुलासा केला, ‘मझ्या आयुष्यात फार काही बदल झालेले नाहीत. जन्मापासून मी ख्रिश्चन होतो. पण आता मी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे…’ २०१९ पासून विवियन डीसेना याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे.

‘२०१९ मध्ये रमजान महिन्यापासून मी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. दिवसातून ५ वेळा नमाज पठण केल्यानंतर मला प्रसन्न वाटतं. ‘ असं देखील अभिनेता म्हणाला… विवियन डीसेना याच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे नौरान हिच्यासोबत अभिनेत्याचं दुसरं लग्न आहे. नौरान हिच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्याने २०१३ मध्ये वाहबिज दोराबजी हिच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *