भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढलं आहे. ज्या दिवशी आकांक्षाने आत्महत्या केली. त्या रात्री एक अनोळखी व्यक्ती आकांक्षाला सोडण्यासाठी तिच्या हॉटेलपर्यंत आली होती.

Akanksha Dubey
Image Credit source: tv9 marathi
वाराणासी : भोजपुरी सिनेमातील आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आकांक्षाने अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षाची आई मधु दुबे हिच्या तक्रारीवरून समर सिंह आणि तिचा भाऊ जय सिंह यांच्यावर आकांक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा शनिवारी नॉर्मल होती. शुटिंगसाठी वाराणासीला आली होती. रविवारी सकाळी तिच्या नव्या सिनेमाचं चित्रीकरण होणार होतं. पण सकाळी तिच्या रुमचा दरवाजा उघडला तर तिचं शरीर पंख्याला लटकलेलं आढळून आलं. आकांक्षाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.