शाहरुख खान हा बॉलिवूडमधल्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचा चाहतावर्ग केवळ देशातच नाही तर जगभरात आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले.

Virat Kohli and Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान आणि क्रिकेटच्या मैदानावरील ‘किंग’ विराट कोहली यांच्यातील नातं जरी मैत्रीचं असलं तरी सध्या या दोघांचे चाहते एकमेकांशी भिडले आहेत. जवळपास गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर शाहरुख आणि विराटचे चाहते एकमेकांविरोधात ट्विट करत आहेत. कोणता सेलिब्रिटी सर्वोत्कृष्ट आहे, हे सिद्ध करण्यासाठी दोघांच्या चाहत्यांमध्ये चुरस रंगली आहे. कोणी शाहरुखच्या अभिनयाचं आणि जगभरात प्रसिद्ध असल्याचं म्हणतंय. तर कोणी विराट कोहलीच्या स्टारडम आणि इन्स्टाग्राम फॉलोअर्सचं उदाहरण देत त्याला शाहरुखपेक्षा मोठं म्हटलं जातंय. ट्विटरवर सुरू असलेल्या या ट्रेंडमध्ये काही चाहते वादग्रस्त ट्विटसुद्धा करत आहेत.