राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय.

Raghav Chadha and Parineeti Chopra
Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूड आणि राजकारणाचं नातं काही नवीन नाही. आजवर असंख्य सेलिब्रिटींनी राजकीय क्षेत्रात सक्रीय असणाऱ्यांशी लग्नगाठ बांधली. नुकतीच अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केलं. त्यानंतर आता अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या दोघांच्या लग्नाबाबत कोणतीच अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र आता त्यावर पहिल्यांदाच परिणीतीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिच्या या प्रतिक्रियेनंतर या दोघांचं लग्न पक्कं ठरलंय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.