अगस्त्याची आई श्वेतालाही या नात्याविषयी आधीच माहिती होती, असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर श्वेताला आधीपासूनच सुहाना आवडायची, असंही समजतंय. त्यामुळे तिच्याकडून दोघांच्या रिलेशनशिपला हिरवा कंदील आहे.

Suhana Khan and Agastya Nanda
Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत समाविष्ट असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मात्र त्याआधीच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पापाराझींची तिच्यावर खास नजर असते. तर दुसरीकडे सुहाना तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळेही चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. आता या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.