ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं.

Ajay Devgn
Image Credit source: Facebook
मुंबई : अभिनेता अजय देवगणने एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला. नाटू नाटूला माझ्यामुळेच ऑस्कर पुरस्कार मिळाला, असं वक्तव्य आता अजयने केलं आहे. आपल्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. यावेळी त्याने ऑस्करसंदर्भातील केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.