Onion Subsidy | खुशखबर ! सरकारने कांदा अनुदानाच्या रकमेत केली वाढ; अनुदानासाठी असा करा अर्ज …

कृषी


Onion Subsidy | मागील काही दिवसांत कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढले आहे. राज्यात कांद्याचे दर पडल्याने शेतकरी चांगलेच चिंतेत होते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा चांगलाच घातला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली होती. दरम्यान सरकारने (State Government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे.

अनुदानाची रक्कम वाढली

राज्य सरकारने कांदा अनुदाना ( Onion Subsidy) बाबतची अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे. या अधिसुचनेनुसार शेतकऱ्यांना आता आनंदाचा धक्का बसणार आहे. सरकारने कांदा अनुदानाची रक्कम वाढवली असून ती 300 ऐवजी 350 रुपये केली आहे. यामध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

200 क्विंटलसाठी अनुदान मिळणार

राज्यातील सर्व बाजार समित्या, खासगी बाजार समित्या, नाफेडला कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान मिळणार आहे. यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. दरम्यान एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटलसाठी अनुदान मिळणार आहे.

यांनाच मिळणार अनुदान

महत्त्वाची बाब म्हणजे परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यामधून वगळण्यात आले आहे.
सरकारच्या अधिसुचनेनुसार परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्यासाठीचे अनुदान मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2013 ते 31 मार्च 2023 या दोन महिन्यांच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला त्यांनाच फक्त अनुदान मिळणार आहे.

अनुदानासाठी असा करा अर्ज …

फक्त लाल कांद्यासाठीच हे अनुदान असणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला आहे, त्या ठिकाणी कांदा विक्री पावती, सात बारा उतारा व बँक खात्याची माहिती अर्जासह जमा करावी. यासंबंधीचे प्रस्ताव बाजार समिती सादर करणार आहे व थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे.

Web Title: State Government increased onion subsidy

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *