MS Dhoni : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी साथ सोडल्यानंतर साक्षीने धरला धोनीचा हात – MS Dhoni relationship with deepika padokone actress raai laxmi married with sakshi

मनोरंजन


MS Dhoni : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी सोडली क्रिकेटरची साथ, पण कोणत्याही परिस्थितीत साक्षीने सोडली नाही माहीची साथ… ही प्रसिद्ध अभिनेत्री देखील होती धोनीची गर्लफ्रेंड…

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध आणि दमदार खेडाळू म्हणजे एमएस धोनी. सामना सुरु असताना धोनी मैदानात उतरल्यानंतर चाहते टाळ्याचा कडकडात करायचे. आजही मैदानावरील धोनीची कामगिरी चाहत्यांच्या लक्षात आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाला देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. सिनेमाच्या माध्यमातून धोनीने केलेला संघर्ष आणि त्याचं खासगी आयुष्य चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आज धोनी पत्नी साक्षी हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण साक्षीच्या आधी धोनीच्या आयुष्यात अनेक तरुणी होत्या. आज धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेवू… (MS Dhoni relationship with actress)

प्रियंका झा : धोनीचं पहिलं प्रेम प्रियंका झा होती. प्रियंकावर धोनी प्रचंड प्रेम करायचा. त्याला प्रियंकासोबत लग्न देखील करायचं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. प्रियंकाचं अपघातात निधन झालं. प्रियंकाच्या निधनानंतर धोनी पूर्णपणे कोलमडला होता.

अभिनेत्री दीपिका पादुकोण : धोनीचा नाव दीपिकासोबत देखील जोडण्यात आलं. जेव्हा दोघांच्या नावाची चर्चा रंगली, तेव्हा दोघेही त्यांच्या क्षेत्रात नवीन होते. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार, धोनी 2007 मध्ये दीपिका पदुकोणच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी दीपिका तिच्या ‘ओम शांती ओम’ सिनेमासाठी आणि धोनी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर चर्चेत होता. दोघांनी एकत्र अनेक रॅम्प वॉक देखील केलं. पण त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

हे सुद्धा वाचाअभिनेत्री राय लक्ष्मी : दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत देखील धोनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राय लक्ष्मी 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड अॅम्बेसेडर बनली होती. तेव्हा धोनी या संघाचा कर्णधार होता. पण अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री असिन : महेंद्र सिंग धोनी याचं नाव ‘गजिनी’ फेम अभिनेत्री आसिन हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. 2010 मध्ये धोनी आणि असिन एकाच ब्रँडचे प्रमोशन करत होते आणि त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. पण त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर धोनीने ०४ जुलै २०१० मध्ये साक्षी हिच्यासोबत लग्न केलं. साक्षी आणि धोनी आज एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. साक्षी आणि धोनी यांना एक मुलगी देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *