Milk Purity Check| दुधामधील भेसळ ओळखणे झाले आता सोप्पे ! आयआयटी मद्रासने बनवले यंत्र

कृषी


How To Check The Purity Of Milk | संतुलित आहारामध्ये दुधाचा प्रामुख्याने समावेश होतो. यामुळे आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी लोक दूध पितात. दुधाचे शरीराला भरपूर फायदे होतात. मात्र बऱ्याचदा आपल्याला बाजारात भेसळयुक्त दूध मिळते. भारत, ब्राझील, चीन, पाकिस्तान या देशांमध्ये दुधाच्या भेसळीची समस्या सर्वात जास्त जाणवत आहे.

दुधाची भेसळ ओळखणे अवघड असते. मात्र मद्रासमधील तज्ज्ञांनी दुधाची भेसळ ओळखणारे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र झटपट दुधामधील भेसळ ओळखते. या यंत्रामुळे घरबसल्या दुधाची भेसळ ओळखणे सोप्पे झाले आहे.

भारतासारख्या कृषिप्रधान व विकसनशील देशात दूध भेसळीची समस्या गंभीर आहे. दुधातील भेसळ ओळखण्याचे बहुतेक प्रकार सामान्य लोकांना परवडत नाहीत. आतापर्यंत दुधाची भेसळ ओळखण्यासाठी प्रयोग शाळेत चाचणी घेतली जात होती. मात्र मद्रास आयआयटीने यासाठी अतिशय सोप्पे यंत्र बनवले आहे.

हे एक पोर्टेबल पेपर बेस्ड डिव्हाईस आहे. यामध्ये दूधामधील युरिया, डिटरजेंट, साबन, स्टार्च, हायड्रोजन, परऑक्साईड, सोडीयम-हायड्रोजन-कार्बोनेट आणि मिठाच्या भेसळीची पडताळणी करणे सोप्पे जाणार आहे. या यंत्रामधून पाणी, सरबत आणि मिल्कशेक मधील भेसळ सुद्धा ओळखता येते.

आयआयटी तज्ज्ञांनी बनवलेले हे यंत्र तीन लेयरचे आहे. याला मायक्रोफ्लूईड यंत्र असे आपण म्हणू शकतो. या यंत्रातील वरचा लेयर आणि खालचा लेयर यामध्ये सॅंडविचसारखा एक मधला लेयर आहे. यावरच लिक्वीड टाकून थोडावेळ सुखू दिले जाते. सुखल्यानंतर त्या दोन्ही पेपर लेयरवर टेप चिकटवली जाते. यामध्ये व्हाटमॅन फिल्टर पेपर ग्रेड 4 चा वापर केला जातो. जो लिक्डीड वाहण्यास मदत करून रिएजेंट्सला स्टोर करण्यास मदत करतो.

भेसळयुक्त दुधामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. यामुळे किडनीचे आजार होतात. तसेच पोटाचे विकार, कर्करोग, डायरिया यांसारख्या रोगांचा सामना देखील करावा लागतो. यामुळे भेसळयुक्त दूध वेळीच ओळखून देणारे हे यंत्र अतिशय फायदेशीर आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *