Kajol | लेकीबद्दल काजोल हिने केले मोठे भाष्य, थेट म्हणाली, न्यासा 19 वर्षांची, अभिनेत्रीचे धक्कादायक विधान – Kajol made a big statement about her daughter Nysa Devgan

मनोरंजन


काजोलची मुलगी न्यासा देवगण ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. न्यासा देवगण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. न्यासा देवगण हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात. न्यासाबद्दल आता काजोलने मोठे विधान केले आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. बऱ्याचदा न्यासा देवगण हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र, यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला अजय देवगण याने न्यासाला दिलाय. भोला चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अजय देवगण (Ajay Devgn) याने काही काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सबद्दल आपले मत मांडले आहे. अजय देवगण हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये त्याच्या भोला या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचला होता. यावेळी कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्यासोबत धमाल, मस्ती करताना अजय देवगण हा दिसला होता.

ट्रोलर्सबद्दल बोलताना अजय म्हणाला होता की, मुळात म्हणजे ट्रोलर्सची संख्या फार कमी आहे, त्या तुलनेत सर्वसामान्य लोकांची संख्या जास्त आहे. चित्रपट किंवा अभिनेते यांच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या जीवनात अनेक समस्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक हे चित्रपटाचा ट्रेलर बघतात आणि चित्रपट बघायचा आहे की नाही हे ठरवतात. मी माझ्या मुलांना सुध्दा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिलाय.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काजोल हिला न्यासाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना काजोल म्हणाली की, न्यासाच्या ट्रांसफॉर्मेशनबद्दल मला अभिमान आहे. मी फक्त एकच सांगते की, आता न्यासा ही 19 वर्षांची असून ती मजा करत आहे. ज्याचा तिला पूर्णपणे अधिकार देखील आहे. पुढे काजोल म्हणाली की, न्यासाला जे काही करायचे आहे त्यामध्ये माझा तिला कायमच सपोर्ट असेल.

काही दिवसांपूर्वी काजोलच्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये न्यासा देवगण हिची तोडकी मोडकी हिंदी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या व्हिडीओनंतर अनेकांनी न्यासाला टार्गेट करण्यासही सुरूवात केली होती. नेटकऱ्यांनी थेट म्हटले होते की, भारतामध्ये राहूनही हिला हिंदी कशी येत नाही.

न्यासा देवगण ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वी एका पार्टीमधून बाहेर पडताना न्यासा देवगण ही दिसली होती. पार्टीमधून ज्यावेळी न्यासा देवगण ही बाहेर येत होती, त्यावेळी तिला चालता देखील येत नव्हते. अनेकांनी या व्हिडीओला ट्रोल करत न्यासा देवगण हिला कमी दारू पिण्याच्या सल्ला दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *