Ajay Devgn | भोला रिलीज होण्याच्या अगोदरच अजय देवगण याचा धमाका, चाहत्यांना दिले हे मोठे गिफ्ट – Ajay Devgn gave a gift to his fans before the release of Bholaa

मनोरंजन


अजय देवगण हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगण याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास एका सेशनचे आयोजन केले होते. या सेशनच्या माध्यमातून अजय देवगण हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण याचा हा चित्रपट 30 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा चाहत्यांना आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहेत. ज्यावेळी मोठ्या बाॅलिवूड स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी अजय देवगण याचा चित्रपट (Movie) धमाल अशी कामगिरी करत होता. भोला या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अजय देवगण याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास एका सेशनचे आयोजन केले होते. या सेशनच्या माध्यमातून अजय देवगण हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. इतकेच नाहीतर भोला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अजय देवगण हा कपिल शर्मा याच्या शोमध्येही पोहचला होता. यावेळी कपिल शर्मा याला अजय देवगण याने अत्यंत मोठा प्रश्न विचारला होता. अजय देवगण म्हणाला की, तू आज अंघोळ करून आलाय का?

अजय देवगण याचा प्रश्न ऐकून कपिल शर्मा याला धक्का बसला होता. अजय देवगण याने भोला हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच चाहत्यांना एक अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे. अजय देवगण याने त्याच्या आगामी मैदान या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केलीये. म्हणजेच आता भोला या चित्रपटानंतर अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलाय येईल.

अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट 23 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दृश्यम 2 चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगण याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अजय देवगण याच्या दृश्यम 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. दृश्यम 2 चित्रपटाला चाहत्यांचे प्रेम मिळाले.

नुकताच अजय देवगण हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये भोला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचला होता. यावेळी अजय देवगण याने अत्यंत मोठा दावा करत म्हटले होते की, माझ्यामुळेच आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. अजय देवगण याने केलेल्या या दाव्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *