Ajay Devgn | अजय देवगण याचा भोला चित्रपट मोडू शकणार हा रेकाॅर्ड? अभिनेता दुहेरी भूमिकेत – Ajay Devgn directorial film Bholaa is likely to be a hit at the box office

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा चित्रपट रिलीज झाला आणि तो चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला. आता अजय देवगण हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही अजय देवगण हा दिसतोय. अजय देवगण याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याने आपल्या चाहत्यांसाठी खास एक सेशनची आयोजन सोशल मीडियावर (Social media) केले होते. या सेशनमध्ये अजय देवगण हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. चाहत्यांनी देखील अजय देवगण यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. एका चाहत्याने तर अजय देवगण याला थेट शाहरूख खान याच्याबद्दल प्रश्न विचारला.

शाहरूख खान याचा पठाण चित्रपट हा बाॅक्स आॅफिसवर हिट ठरलाय. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरूख खान हा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरूख खान हा देखील चाहत्यांसाठी सेशनचे आयोजन करत होता.

काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. त्यावेळी दृश्यम 2 या चित्रपटाने धमाका करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. दृश्यम 2 चित्रपटाला चाहत्यांचे प्रचंड असे प्रेम मिळाले आहे.

विशेष म्हणजे भोला चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: अजय देवगण यानेच केले आहे. अजय देवगणचा भोला हा चौथा चित्रपट असेल ज्याचे त्याने स्वतः दिग्दर्शन केले आहे. आता अजय देवगण याचा भोला बॉक्स ऑफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यू मी और हम आणि रनवे 34 हे यापूर्वी अजय देवगण याने दिग्दर्शन केलेले चित्रपट आहेत. मात्र, हे दोन्ही चित्रपट फ्लाॅप गेले. फक्त अजय देवगण याने दिग्दर्शित केलेला शिवाय हा चित्रपट ठिक कामगिरी करू शकला.

आता भोला चित्रपट नेमके कोणते रेकाॅर्ड तोडतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट 30 तारखेला चाहत्यांच्या भेटीला येतोय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सेल्फी हा अक्षय कुमार याचा चित्रपट फ्लाॅप गेलाय. सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार हा दिसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *