‘रात्री कॉफीसाठी बोलावलं आणि…’, अभिनेत्याचा कास्टिंग काउचवर धक्कादायक खुलासा – actor ravi kishan breaks silence on casting couch experience

मनोरंजन


आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काउचवर धक्कादायक खुलासे केले आहेत, पण आता अभिनेत्याला आलेला अनुभव म्हणजे…

मुंबई : झगमगत्या विश्वातील ग्लॅमर आणि पैसा सर्वांना आकर्षित करतो. पण या झगमगत्या आणि ग्लॅमरच्या विश्वातील काळं सत्य म्हणजे कास्टिंग काउच. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काउचबद्दल आलेला त्यांचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. कास्टिंग काउचसारख्या वाईट गोष्टीचा सामना फक्त अभिनेत्रींनाच नाही तर, अभिनेत्यांना देखील करावा लागला. पण काही ठराविक अभिनेत्यांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. अभिनेते आणि राजकारणी रवी किशन यांनी कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

रवी किशन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनय विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. सिनेमांमध्ये भूमिका देण्यासाठी त्यांना एक ऑफर देण्यात आली होती. अनेक वर्षांनंतर अखेर रवी किशन यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रवी किशन यांनी इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत असताना त्यांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आहे, ज्याने रवी किशल यांना सिनेमात काम देण्याच्या बदल्यात एक ऑफर दिली होती.

मुलाखतीत रवी किशन म्हणाले, ‘याठिकाणी मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. कारण ती व्यक्ती आता फार मोठी आहे. त्यांनी मला सांगितलं, ‘रात्री कॉफीसाठी ये…’ त्यानंतर मला असं वाटलं रात्री कोण कॉफी पितं.. मला कळालं त्यांना काय बोलायचं होतं… त्यानंतर मी त्यांना नकार दिला…’ रवी किशन यांनी ऑफर देणाऱ्या व्यक्तीचं नाव घेता, धक्कादायक खुलासा केला.

रवी किशन यांनी ‘पितांबर’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहच्यांच्या मनात राज्य केलं. त्यानंतर रवी किशन यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘आर्मी’, ‘हेरा फेरी’, ‘तेरे नाम’, ‘लक’, ‘एजेंट विनोद’, ‘मुक्काबाज’ या सिनेमांमध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

रवी किशन एक असे अभिनेते आहेत, ज्यांनी भोजपुरी, हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, बिग बॉस आणि झलक दिखला जा यांसारख्या रिऍलिटी शोमध्ये देखील रवी किशन झळकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *