प्रियांका चोप्रा हिने सुशांत सिंह राजपूतप्रमाणे पाऊल उचलले नाही, चित्रपट निर्मात्याने केले खळबळजनक विधान – The filmmaker made a big statement about Priyanka Chopra

मनोरंजन


अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच एक मुलाखती दिलीये. प्रियांका चोप्रा हिच्या या मुलाखतीनंतर अनेकांना मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे आता बाॅलिवूडमधील अनेकांनी प्रियांका चोप्रा हिला सपोर्ट केलाय. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांचे नाव देखील आहेत.

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये तिने काही मोठे खुलासे केले. या मुलाखतीनंतर प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा हिने अखेर माैन सोडत बाॅलिवूड सोडण्याचे कारण सांगून टाकले. कशाप्रकारे तिला बाॅलिवूडमध्ये त्रास दिला गेला हे सर्व सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसलीये. प्रियांका चोप्रा हिच्या या मुलाखतीनंतर अनेकांना मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे आता बाॅलिवूडमधील (Bollywood) अनेकांनी प्रियांका चोप्रा हिला सपोर्ट केलाय. सर्वात अगोदर कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट केला. कंगना राणावतनंतर विवेक अग्नीहोत्री यांनीही प्रियांका चोप्राचे समर्थन केले.

मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासे करत प्रियांका चोप्रा म्हणाली की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मला एका कोपऱ्यात ठेवले जात होते. लोक मला चित्रपटांसाठी कास्ट करत नव्हते. माझे लोकांशी भांडण होत होती. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मोठे राजकारण आहे, जे मला करणे शक्य नव्हते. यामुळे यासर्व गोष्टींना मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.

प्रियांका चोप्रा हिने आपल्या या मुलाखतीमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधील भेदभावावर देखील भाष्य केले आहे. आता प्रियांका चोप्रा हिचे समर्थन करत चित्रपट निर्माता अपूर्व असरानी याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमध्ये अपूर्व असरानी म्हणाला की, अखेर शेवटी प्रियांका चोप्रा हिने खुलासा केला जे सर्वांना माहिती होते…मात्र, कोणीही यावर एक शब्द नाही काढला…

पुढे अपूर्व असरानी म्हणाला, ज्यांनी प्रियांका चोप्रा हिच्यावर बहिष्कार टाकला त्यांचे मी अभिनंदन करतो…ज्यांनी तिला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना शुभेच्छा….प्रियांका चोप्रा हिने परवीन बाबी आणि सुशांत सिंह राजपूत यांच्याप्रमाणे स्वत:ला मारले नाही हा मोठा विजय आहे…आता अपूर्व असरानी याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाहीतर करण जोहर याच्या पार्ट्यांमध्येही प्रियांका चोप्रा हिला बंदी होती. बाॅलिवूडमध्ये प्रियांका चोप्रा हिने खूप काही सहन केल्याचे तिच्या या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा ही तब्बल तीन वर्षांनंतर भारतामध्ये आली होती. प्रियांका चोप्रा हिने मुंबई मेरी जान म्हणत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *