प्रियांकाने बॉलिवूड सोडण्याचं सांगितलं कारण, कंगना म्हणाली, ‘सर्वांना माहिती आहे करण जोहरने तिच्यासोबत…’ – priyanka chopra breaks silence on bollywood and kangana ranaut targets karan johar

मनोरंजन


बॉलिवूडपासून अनेक वर्ष का दूर आहे प्रियांका चोप्रा? अखेर ‘देसी गर्ल’च्या मनातील खंत आली बाहेर… अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर कंगना रनौत हिने साधला दिग्दर्शक करण जोहर याच्यावर निशाणा…

मुंबई : फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून प्रियंका बॉलिवूडपासून दूर आहे. अशात प्रियांका पुन्हा मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी पदार्पण करणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंलेल्या असतात. पण खुद्द प्रियांकाने बॉलिवूडपासून दूर असल्याचं कारण सांगितलं आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्रीला सांगण्यात आलं होतं. प्रियांकाच्या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिने दिग्दर्शक करण जोहर याच्यावर निशाणा साधला आहे.

बॉलिवूडबद्दल काय म्हणाली प्रियांका चोप्रा?

प्रियांका म्हणाली, ‘इंडस्ट्रीने मला एका बाजूला करुन दिलं. लोक मला सिनेमांमध्ये ऑफर करत नव्हते. मला काही खेळ खेळता येत नाहीत. बॉलिवूडमधील राजकारण मला जमलं नाही. म्हणून मी थकली होती. त्यानंतर मला ब्रेक हवा आहे असं मी म्हणाली….’ बॉलिवूडबद्दल प्रियांकाने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचाकंगनाने ट्विट करत बॉलिवूडची एक बाजू समोर आणली आहे. प्रियांका हिला भारत सोडून अमेरिकेत काम करण्यासाठी कंगनाने करण जोहर याला जबाबदार ठरवलं आहे. कंगना म्हणाली, प्रियांका आणि शाहरुख यांची मैत्री असल्यामुळे करण जोहर याच्यासोबत प्रियांकाचे वाद होते. सध्या सर्वत्र कंगनाच्या ट्विटचीच चर्चा आहे.

क1

ट्विट करत अभिनेत्री म्हणाली, ‘एक अशी गोष्ट जी प्रियांकाने बॉलिवूडबद्दल सांगितीली आहे. लोकांनी प्रियांकाच्या विरोधात एक गट तयार केला होता. तिला प्रचंड त्रास दिला आणि इंडस्ट्रीतून तिला बाहेर काढलं. स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्रीला भारत सोडण्यासाठी प्रवृत्त केलं. आज प्रत्येकाला माहिती आहे करण जोहरने प्रियांकाला बॅन केलं.’

कंगना दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाली, ‘टॉक्झिक, जेलस आणि घृणास्पद व्यक्तीला सिनेविश्वाची संस्कृती बिघडवण्यासाठी जबाबदार धरलं पाहिजं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्या काळाच कधीही आऊटसाईडर्ससोबत भेदभाव झाला नव्हता…’ असं देखील कंगना ट्विट करत म्हणली.

प्रियांका चोप्रा आणि कंगना रनौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघींनी ‘फॅशन’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. दिग्दर्शक मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ सिनेमाचं विश्लेषकांनी कौतुक केलं.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *