प्रसिद्ध गायकावर पत्नीकडून गंभीर आरोप; गायकाविरोधात तक्रार दाखल – singer danish alfaaz accused by wife fir files in mumbai

मनोरंजन



पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध गायकाच्या अडचणीत वाढ; पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर… सर्वत्र गायकावर करण्यात आलेल्या आरोपांची चर्चा

मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि गायक दानिश अल्फाजवर (singer danish alfaaz) पत्नीने गंभीर आरोप केल्यामुळे गायकाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र दानिश अल्फाज याचीच चर्चा रंगत आहे. दानिश अल्फाजच्या पत्नीने गायकावर शारीरिक अत्याचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचे आरोप केले आहेत. दानिशच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले असून, मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आता पुढे काय होणार… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रिपोर्टनुसार पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दानिश अल्फाजच्या विरोधात आयपीसी कलम ३७६, ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे), ४९८ (अ) बेकायदेशीर छळ आणि बेकायदेशीर मागणी, ४०६ (फसवणूक) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या सर्वत्र दानिश अल्फाजवर करण्यात आलेल्या आरोपांमुळ खळबळ माजली आहे. (danish alfaaz new song)

दानिश अल्फाज सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. सोशल मीडियावर दानिश अल्फाजच्या चाहत्यांचूी संख्या फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर दानिश अल्फाजचे जवळपास २१ लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर दानिश अल्फाजने स्वतःची ओळख गायक, लिरिसिस्ट आणि एंटरटेनर म्हणून करुन दिली आहे.

दानिश अल्फाजने नुकताच अभिनेत्री डेजी शाह हिच्यासोबत एक गाणं तयार केलं. दानिश अल्फाजचं नवं गाणं १८ मार्च रोजी प्रदर्शित झालं आहे. काही दिवसांत डेजी शाह हिच्यासोबत तयार केलेल्या गाण्याला २.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला संगीत प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद गाबा याने दिलं आहे. (danish alfaaz news)

मिळालेल्या माहितीनुसार; दानिश अल्फाजने त्याच्या करियरची सुरुवात अभिनेत्री पूनम पांडे आणि अभिनेते शक्ती कपूर यांच्या ‘द जर्नी ऑफ कर्मा’ सिनेमातून केली. ३२ वर्षांचा दानिश अल्फाज उत्तर प्रदेश येथील मेरठचा आहे. (danish alfaaz interview)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *