तुमच्या अंदाजानुसार एका रेड्याची किंमत किती असू शकते ? जास्तीत जास्त काही लाखात ! मात्र आता तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु, शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो मध्ये कोटींच्या किंमतीची रेडा पहायला मिळाला. विशेष म्हणजे या रेड्याची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल 12 कोटी आहे.
12 कोटींचा रेडा ठरला खास आकर्षण
पशुसंवर्धन विभागाने आयोजित केलेल्या महापशुधन एक्स्पो 2023 मध्ये हा रेडा पहायला मिळाला. याआधी कोल्हापूर येथील भीमा कृषी प्रदर्शनात देखील हा रेडा होता. या रेड्याला पाहण्यासाठी फार लांबून येऊन लोकांनी उपस्थिती लावली होती. हा रेडा शिर्डी येथील प्रदर्शनात देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ( centre of attraction) आहे.
मुख्यमंत्र्याना रेड्याची भुरळ
दरम्यान रविवारी ( ता.26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो 2023 ला भेट दिली. यावेळी त्यांनी या रेड्याचा आपल्या भाषणात उल्लेख केला. इतकेच नाही तर हा बहुचर्चित रेडा पाहण्यासाठी ते खास रेड्याच्या दालनात येऊन पोहोचले.
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
रेड्यापासून वर्षाला मिळतात 70 ते 80 लाख
हा 12 कोटींचा प्रसिद्ध दिमाखदार रेडा हरियाणा येथील असून तो मुऱ्हा जातीच्या म्हैस या प्रवर्गात येतो. या रेड्याच्या मालकाला त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. हा रेडा वर्षाला 70 ते 80 लाखांचे उत्पन्न मिळवून देतो. जगातील सर्वात मोठा रेडा अशी या रेड्याची ओळख आहे.
वीर्यामुळे आहे जास्त किंमत
खरंतर, या रेड्याच्या वीर्यामुळे त्यांची एवढी मोठी किंमत आहे. हा रेडा सध्या चार वर्षांचा असून त्याचे वजन तब्बल 1100 किलो आहे. फक्त कोल्हापूर, शिर्डीच ( Kolhapur & Shirdi) नाही तर विदेशात ( foreign) देखील या रेड्याची चांगलीच चर्चा होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
CM get attracted towards Buffalo of 12 coats