सोनू सूद याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोनू सूद याच्या या व्हिडीओनंतर तो चर्चेत आलाय. आता सोनू सूद याने शेअर केलेला व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनू सूद याने जाहिरपणे नेपोटिझमचे समर्थन केले होते. सोनू सूद याचे नेपोटिझमवरील बोलणे ऐकून चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला होता. कोरोनाच्या काळात सर्वांनाच मदत करताना सोनू सूद हा दिसला. विशेष म्हणजे सोनू सूद हा सोशल मीडियावरही (Social media) प्रचंड सक्रिय असतो. सोनू सूद याने नपोटिझमवर केलेल्या वक्तव्यांनंतर अनेकांनी त्याच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली होती. नुकताच सोनू सूद याने एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमुळे आता सोनू सूद हा चर्चेत आलाय.
सोनू सूद याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पंजाब येथे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सोनू सूद याच्या या व्हिडीओमध्ये जॅकलिन फर्नांडिस देखील आहे. सध्या पंजाबमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि सोनू सूद हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. आता सोनू सूद याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
सोनू सूद याने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, वाहेगुरु जी दा खालसा श्री वाहेगुरु की फतेह….आता सोनू सूद याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोनू सूद याच्या आगामी चित्रपटाचे नाव देखील फतेह असे आहे. सोनू सूद याने शेअर केलेला हा व्हिडीओ पंजाब येथील सुवर्ण मंदिरातील आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस सुवर्ण मंदिरात गेले आहेत. यावेळी सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या भोवती चाहत्यांनी मोठी गर्दी केलीये. मात्र, सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांना एकत्र पाहून चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची पाय खोलात असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले आहे. फक्त जॅकलिन फर्नांडिस हिच नाहीतर सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिचे देखील नाव आले आहे. सुकेश चंद्रशेखर याने अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना महागडे गिफ्ट दिले आहेत.