सुनील ग्रोव्हर याने आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. पण कपिल शर्मा शोमधून तो अचानक बाहेर झाल्याने अनेकांना धक्का बसला होता. यामागचं कारण काय होतं?
मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर ( Sunil Grover ) त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. गुथी असो रिंकू भाभी असो की डॉ. मशूर गुलाटी. प्रत्येक भूमिकेत सुनीलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक जण त्याच्या कॉमेडीचे फॅन आहेत. सुनील ग्रोव्हर हा कपिल शर्मा याच्या द कपिल शर्मा शो ( The Kapil Sharma SHow ) मध्ये दिसला होता. गेल्या अनेक वर्षांपासून लोक या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत की सुनील ग्रोव्हर या शोमधून बाहेर का गेला.
नुकत्याच एका मुलाखतीत सुनील ग्रोव्हरने यावर खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, त्याला कोणतीही कल्पना न देता शोमधून ‘रिप्लेस’ केले गेले. त्याच्या या वक्तव्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे. त्याचं हे विधान कपिल शर्मा शो सोबत जोडलं जात आहे. ई-टाइम्सशी बोलताना सुनील ग्रोव्हरने कोणाचेही नाव न घेता एका शोमधून त्याला रिप्लेस केल्याबद्दल सांगितले.
सुनील ग्रोवर पुढे म्हणाला की, “मला स्वतःवर खूप शंका होती, मला वाटले नाही की मी पुन्हा त्यांच्या सोबत शूट करु शकले. म्हणून मी जवळपास महिनाभर वाट पाहत होतो. मग मला वाटले की कदाचित तसं होणार नाही. त्याचा पाठपुरावा केला.
सुनील ग्रोवर याने ‘चला लल्लन हिरो बना’ या वेब सीरिजमधून अभिनयात पदार्पण केले आणि गब्बर इज बॅक, भारत, बागी सारखे अनेक बॉलिवूड चित्रपट केले, त्याने अलिकडेच अलविदा हा सिनेमा केला. तो शाहरुख खान स्टारर जवान या चित्रपटात दिसणार आहे आणि त्याच्याकडे मानव शाह यांची युनायटेड कच्छे नावाची वेब सीरिज देखील आहे.