Ram Charan : भव्य बंगला, गाडी, तगडं बँक बॅलेन्स… जाणून घ्या अभिनेत्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीबद्दल – Happy Birthday Ram Charan Ram Charan Net Worth

मनोरंजन



राम चरण यांच्या चाहत्यांची संख्या जितकी मोठी तितकाच अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा.. .. अभिनयाशिवाय श्रीमंतीमध्ये देखील राम चरण देतो अनेकांना मात… वर्षाला कमावतो इतके कोटी…

मुंबई : दाक्षिणात्य सिनेविश्वात असे काही अभिनेते आहेत, ज्यांनी फक्त साऊथ सिनेविश्वासाठी मोलाची कामगिरी केली. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे, अभिनेता राम चरण.. राम अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याच्या सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात. मेगास्टार चिरंजीवी यांचे पूत्र राम चरण सध्या अभिनय क्षेत्रात अव्वल स्थानी आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राम चरण यांच्या चाहत्यांची संख्या जितकी मोठी आहे, तितकाच मोठा अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा देखील आहे. भव्य बंगला, गाडी, तगडं बँक बॅलेन्स… असलेल्या राम चरण याच्या संपत्तीबद्दल आज आपण जाणून घेवू.

राम चरण आणि अभिनेत्याचं कुटुंब हैदराबाद येथील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अभिनेत्याची नेटवर्थ जवळपास १३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. RRR फेम अभिनेता हैदराबादमधील जुबली हिल्स येथे प्राइम लोकेशनवर असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहतो. रामच्या बंगल्यात सर्व सुविधा आहेत. अभिनेत्याची बंगल्याची किंमत जवळपास ३८ कोटी रुपये आहे.

रॉयल आयुष्य जगणाऱ्या राम चरण याच्याकडे महागड्या गाड्याचं देखील मोठं कलेक्शन आहे. अभिनेत्याकडे रोल्स रॉयस फँटमसारखी आलिशान कार आहे, या कारची किंमत तब्बल सात कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर राम चरण याच्याकडे तीन कोटींची अॅस्टन मार्टिन V8 कार देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार अभिनेत्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सासऱ्यांकडून भेट म्हणून मिळाली होती. शिवाय राम चरण याच्याकडे रेंज रोव्हर कार देखील आहे.

हे सुद्धा वाचा



अनेक महागड्या गाड्यांशिवाय राम चरण याच्याकडे अनेक घड्याळ आहेत. अभिनेत्याकडे अनेक महागडे घड्याळं आहेत. राम चरण याच्याटकडे ३० घड्याळ आहेत. अभिनेत्याने एकदा नॉटिलस ब्रँडचं घड्याळ घातलं होतं, ज्याची किंमत 80 लाख रुपये आहे. असं सांगण्यात येतं.

राम चरण फक्त अभिनेता नसून उद्योजक देखील आहे. अभिनेता ट्रुजेट एअरलाइन्स कंपनीचा अध्यक्ष आहे. या कंपनीमध्ये अभिनेत्याने जवळपास १२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राम चरण फक्त त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठीच नाही तर, इतर ठिकाणी जाण्यासाठी देखील त्याच्या खाजगी जेटचा वापर करतो.

राम चरण याचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस देखीली आहे. याचं मुख्य कार्यलय हैदराबाद येथे आहे. या कंपनीअंतर्गत अनेक सिनेमांची निर्मिती झाली आहे. या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली २०१७ मध्ये प्रदर्शित झालेले कैदी नंबर 150, साई रा नरसिम्हा रेड्डी आणि आचार्य सारखे सिनेमे बनवण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरण एका चित्रपटासाठी सुमारे १२ कोटी रुपये मानधन घेतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *