Nawazuddin Siddiqui चे तीन लग्न, गरोदर पत्नीच्या पोटात मारली लाथ; भावाकडून अभिनेत्यावर गंभीर आरोप – nawazuddin siddiqui brother shamas charged Allegations on actor

मनोरंजन


‘लॉकडाऊन दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी केलं लग्न, त्यानंतर पत्नीसोबत…’ भावाकडून नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप.. नवाजच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खासगी आयष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने पती नवाजु्द्दीन याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्यांच्या भावाने देखील नवाजवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याच्या वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नीसोबत असलेल्या वादामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि पत्नी आलियाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. अभिनेत्याने घेतलेल्या निर्णयानंतर नवाजच्या भावाने धक्कादायक खुलासे केले आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीने शमसुद्दीन आणि आलिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करत अभिनेत्याने १०० कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केली. त्यानंतर शमास सिद्दीकीने ट्विटरच्या माध्यमातून एक यादी जाहीर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शमसुद्दीन याने शेअर केलेल्या पोस्टची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र सिद्दीकी कुटुंबात आलेल्या संकटाची चर्चा होत आहे. शमसुद्दीन पोस्टमध्ये म्हणतो, ‘नवाजुद्दीन सिद्दीकी याने तीन लग्न केली आहेत. यामध्ये एक लग्न त्याने लॉकडाऊन दरम्यान इशासोबत केलं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव फिरोजा असं आहे.’ शिवाय शमसुद्दीन याने अभिनेत्यावर मारहाणीचे देखील आरोप केले आहेत.

हे सुद्धा वाचा‘नवाजुद्दीन सिद्दीकी याने वहिनी गर्भवती असताना पत्नीच्या पोटात लाथ मारली. तिच्यासोबत गैरवर्तन केलं.’ असं देखील शमसुद्दीन याने पोस्टमध्ये भावाविरोधात लिहिलं आहे. पुढे शमसुद्दीन पोस्टमध्ये म्हणाला, ‘नवाजुद्दीन स्वत:ला गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणवतो, पण त्याचे वडील कोट्यवधी जमीनीचे मालक होते…’

एवढंच नाही तर, अभिनेत्यावर मीटूचे आरोप, पुस्तकावरून झालेला वाद, सोसायटीच्या पार्किंगमध्ये हिना खान आणि सोनी दांडेकर यांच्यावर विनयभंगाचे प्रकरण, भाची साशा सिद्दीकीच्या कुटुंबीयांनी दाखल एफआयआर, कर्मचाऱ्यांसोबत अत्याचार, कौटुंबिक जमिनीचा वाद, असे अनेक आरोप अभिनेत्यावर करण्यात आले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर कुटुंबाकडून अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाने एक व्हिडीओ शेअर करत नवाजने मुलांसह घराबाहेर काढल्याचे आरोप केले होते.

तर आलिया मला मुलांना भेटू देत नाही… असे आरोप अभिनेत्याने पत्नीवर केले होते. अशात फक्त आलिया हिनेच नाही तर, शिवाय आलियाच्या वकिलांनी देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. पत्नीच्या आरोपांनंतर अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *