Dhanush | रजनीकांत यांचा जावई ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीशी करणार दुसरं लग्न? नात्याबद्दल स्पष्टच म्हणाली.. – rajinikanth son in law dhanush second marriage with actress meena rumours here is the truth

मनोरंजन

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 27, 2023 | 9:00 AM

धनुष आणि ऐश्वर्या यांनाही दोन मुलं आहेत. या दोघांनी 2004 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. 17 जानेवारी 2022 रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

Mar 27, 2023 | 9:00 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि रजनीकांत यांचा जावई धनुष याने गेल्या वर्षी पत्नी ऐश्वर्या रजनीकांतला घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. 18 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला.

मध्यंतरीच्या काळात धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा होती. मात्र त्या दोघांकडून याबाबत कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र आता धनुषचं नाव एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीशी जोडलं जातंय.

धनुषचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री मीनाशी जोडलं जातंय. गेल्याच वर्षी मीनाच्या पतीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. ते सॉफ्टवेअर इंजीनिअर होते.

एका तमिळ अभिनेत्याने त्याच्या युट्यूब चॅनलवर धनुष आणि मीना लग्न करणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर या चर्चांनी जोर धरला. हे दोघं जुलैमध्ये लग्न करणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

या चर्चांवर आता मीनाची प्रतिक्रिया समोर आली आहे. "मी अजूनही माझ्या पतीला विसरले नाही. मी त्या दु:खातून अजून सावरले नाही. अजूनही मला त्या दु:खद गोष्टीवर विश्वास नाही", असं मीना म्हणाली.

या चर्चांवर आता मीनाची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी अजूनही माझ्या पतीला विसरले नाही. मी त्या दु:खातून अजून सावरले नाही. अजूनही मला त्या दु:खद गोष्टीवर विश्वास नाही”, असं मीना म्हणाली.

लग्नाच्या या अफवा कुठून पसरवल्या जात आहेत काय माहीत, असंही ती म्हणाली. मीनाने असंही म्हटलंय की तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. आपल्या मुलीला चांगलं भविष्य देण्यासाठी ती चांगल्या प्रोजेक्ट्सच्या प्रतीक्षेत आहे.

दुसरीकडे धनुष आणि ऐश्वर्या यांनाही दोन मुलं आहेत. या दोघांनी 2004 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. 17 जानेवारी 2022 रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *